मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 18 जानेवारी 2024 (15:31 IST)

मुस्लिम तरुणाच्या शरीरावर रामाचा टॅटू, महिलांच्या मेहेंदीमध्ये सीता राम, Ram Naam Tattoo ट्रेंडमध्ये

ram tattoo
Ram Naam Tattoo on Muslim Youth Body: आज संपूर्ण देश राम नामाच्या भक्तीत हरवून गेला आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचे आयोजन करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने हिंदू अयोध्येला जात आहेत. विशेष म्हणजे राम नावाची क्रेझ केवळ हिंदूंमध्येच नाही तर मुस्लिम समाजातील तरुणांमध्येही पसरली आहे.
 
राजस्थानच्या जोधपूरमधील तरुणांना राम नावाची ओढ लागली आहे. परिस्थिती अशी आहे की येथे रामाचे नाव गोंदवण्याचा ट्रेंड आहे. विशेष म्हणजे हिंदू तरुणांसोबतच मुस्लिम तरुणही आपल्या अंगावर राम नावाचा टॅटू गोंदवत आहेत.
 
ईश्वर अल्लाह सर्व एक : सोशल मीडियावर जे फोटो समोर येत आहे, त्यात दिसून येत आहे की हिंदुंसह मुस्‍लिम तरुण देखील आपल्या हातावर राम नावाचे टॅटू गोंदवत आहे. जोधपूरच्या बाजारात हिंदू तरुणांसोबत बसून अंगावर ‘राम’ नावाचा टॅटू काढत या मुस्लिम तरुणांना मुस्लिम रामभक्तांचा समूह म्हटले जात आहे. देव आणि अल्लाह एकच असल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे.
 
मुस्लिमांनी मागे का राहावे: तरुणांचे म्हणणे आहे की त्यांचे राजकारण केले गेले आहे, ज्यामुळे परस्पर बंधुत्व आटले आहे. जोधपूर हे शांतताप्रिय शहराचे प्रतीक आहे आणि या ठिकाणाची ओळख आहे. यामुळेच प्रत्येकजण एकमेकांच्या सण, उत्सव आणि कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतो, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून पाहिले जाते. आता राम मंदिर बांधले जात असताना येथील मुस्लिम जनता कशी मागे राहील. त्यामुळे या तरुणांनी आपल्या अंगावर ‘राम’ नावाचा गोंदवून बंधुभावाचा अप्रतिम नमुना सादर केला. संधी मिळाल्यास अयोध्येतील राम मंदिरालाही भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
काय म्हणतो टॅटू आर्टिस्ट : जोधपूरचे टॅटू आर्टिस्ट सांगतात की, गेल्या काही दिवसांत बहुतांश लोकांच्या शरीरावर 'राम' नावाचा टॅटू गोंदवला आहे. ‘राम’ नावाच्या टॅटूची क्रेझ हिंदूंमध्येच नाही तर मुस्लिम तरुणांमध्येही पाहायला मिळत आहे, त्यातून त्यांच्या भावना व्यक्त होत आहेत. त्याचबरोबर महिला मेहंदीमध्ये राम मंदिर आणि राम-सीतेच्या डिझाईनही बनवत आहेत. त्याचे काही फोटोही समोर आले आहेत आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.