सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 8 जानेवारी 2023 (10:15 IST)

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांचे निधन

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांचे सोमवारी वयाच्या 88 व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. पंडित केशरीनाथ दीर्घकाळापासून आजारी होते. केशरीनाथ यांची  आज 8 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता प्रयागराज येथे प्राण ज्योत मालवली.
 
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंडित केशरीनाथ त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
 
भाजपचे ज्येष्ठ नेते केशरीनाथ त्रिपाठी हे तीन वेळा विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. केशरीनाथ यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1934 रोजी झाला. पंडित केशरीनाथ त्रिपाठी हे त्यांच्या वडिलांच्या सात मुलांपैकी चार मुली आणि तीन मुलांपैकी सर्वात लहान होते. ते जुलै 2014 ते जुलै 2019 पर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. केशरी नाथ यांनी बिहार, मेघालय आणि मिझोरामचे राज्यपाल म्हणूनही पदभार स्वीकारला. याशिवाय केशरीनाथ त्रिपाठी हे भाजपच्या उत्तर प्रदेश युनिटचे अध्यक्ष होते.
 
Edited By - Priya Dixit