शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (23:41 IST)

गेमसाठी आईवर झाडल्या गोळ्या

UP Crime: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे एका अल्पवयीन मुलाने PUBG गेम खेळण्यापासून रोखल्यामुळे त्याच्या आईची गोळ्या घालून हत्या केली. पोलिस तपासात या मुलाला PUBG गेमचे व्यसन असल्याचे समोर आले आहे. आईच्या शिवीगाळामुळे मुलाने वडिलांच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने आईच्या डोक्यात गोळी झाडली.
 
मृतदेह तीन दिवस घरात लपवून ठेवला होता
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लखनऊच्या पीजीआय भागातील आहे. आरोपी मुलाने आईची हत्या केल्यानंतर मृतदेह तीन दिवस घरात लपवून ठेवला होता. यासोबतच लहान बहिणीलाही घरातील एका खोलीत कोंडून ठेवले होते. आरोपीने दोन दिवस रूम फ्रेशनरमधून मृतदेहाचा वास लपवून ठेवला होता.
 
मृतदेहातून दुर्गंधी वाढल्यानंतर वडिलांना फोन केला
मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्यावर आरोपीने फोन करून वडिलांना घटनेची माहिती दिली. आरोपीचे वडील लष्करात असून ते आसाममध्ये तैनात आहेत. वडिलांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती लखनऊ पोलिसांना दिली.
 
पोलिसांनी अटक केली
पूर्व लखनौच्या एडीसीपीने सांगितले की, एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईला पबजी गेम खेळण्यापासून रोखल्यानंतर गोळ्या घालून ठार केले. त्याला खेळाचे व्यसन असल्याने त्याची आई त्याला खेळण्यापासून रोखत असे, त्यामुळे त्याने वडिलांच्या पिस्तुलाने हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.