पंजाबमध्ये तरुणांना स्मार्टफोन्स वाटप होणार
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे लवकरच राज्यातील तरुणांना स्मार्टफोन्स वाटणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. स्मार्टफोन्सच्या वितरणासाठी बुधवारी राज्य कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्यात सरकारी शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्मार्टफोन्स वाटले जाणार आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना स्व प्रमाणपत्र सरकारला द्यावे लागणार आहे. राज्याचे डिजिटल सशक्तीकरण अंतर्गत ही योजना राबवली जात आहे. या योजनेमुळ आता लवकरच तरुण विद्यार्थ्यांना स्मार्टेफोन्स दिले जातील मात्र हे स्मार्टफोन्स कोणत्या कंपनीचे आणि किती किमतीचे असतील याची माहिती देण्यात आली नाही.
या स्मार्टफोन्समध्ये विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी दररोज १२ GB इंटरनेट दिले जाणार आहे. या बरोबर महिन्याचा ६०० मिनीटांचा टाॅकटाईम देण्यात येणार आहे. सध्या या स्मार्टफोन्सवर निविदा काढण्याचे काम सुरु आहे. विविध कंपन्यांकडून निविदा मागवण्यात येत आहेत. २१०६ मध्ये काँग्रेस सरकारने सर्वांना स्मार्टफोन्स देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासना नुसार राज्यात ५० लाख स्मार्ट फोन्स राज्यात वाटावले लागणार होते.