मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जानेवारी 2019 (16:57 IST)

लाजिरवाणे, वधूची कौमार्य चाचणी करण्याची कुप्रथा अजुनही सुरूच

कंजार भाट समाजात वधूची कौमार्य चाचणी (virginity test) करण्याची कुप्रथा अजुनही सुरूच असल्याचं समोर येतंय. पुण्यातील एका माजी नगरसेवकाच्या मुलाचं लग्न एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीशी गेल्या आठवड्यात झालं. विशेष म्हणजे वधू आणि वर दोघेही उच्चशिक्षित आहेत. इतकंच नाही तर नवऱ्या मुलानं लंडनहून आपलं शिक्षण पूर्ण केल आहे. लग्नसोहळा पार पडल्यानंतर समाजाची जात पंचायत भरली. या जातपंचायतीत मुलाला मुलीच्या कौमार्याविषयी पंचाकडून विचारणा करण्यात आली. त्यावर मुलानं 'समाधान, समाधान, समाधान' असं उत्तर दिलं. धर्मादाय आयुक्तालयातील उपायुक्त कृष्णा इंद्रेकर यांनी या प्रकाराला वाचा फोडलीय.