सोनिया गांधी यांचे सरकारवर टीकास्त्र
देशात सुधारित नागरिकत्व कायम विरोधात आठवड्याभरापासून सुरु असलेल्या आंदोलनांनी आता हिंसक रुप धारण केले आहे. दरम्यान, आंदोलकांवर पोलीस बळाचा वापर केला जात आहे. या पार्श्वभूीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. जनतेचा आवाज दाबण्यासाठी सरकार क्रूरपणे बळाचा वापर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली.
सोनिया म्हणतात, लोकशाहीमध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात जनतेला आवाज उठवायचा, आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असतो. देशात सध्या हेच सुरु आहे. मात्र, भाजप सरकारने जनतेच्या या आवाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. उलट आपल्या विरोधातला हा आवाज दाबण्यासाठी क्रूरपणे बळाचा वापर केला जात आहे.
भाजप सरकार देशभरात होत असलेल्या विद्याथ्र्यांचे आणि जनतेचे आंदोलन ज्या प्रकारे दाबण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यावर काँग्रेस पक्ष चिंतीत आहे. काँग्रेस विद्यार्थी आणि जनतेच्या संर्घषात त्यांच्यासोबत आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसची भूमिका मांडली.