रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 18 सप्टेंबर 2024 (11:37 IST)

मुलांसाठी आज पासून विशेष एनपीएस वात्सल्य योजना सुरु होणार

पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पहिल्या अर्थसंकल्पात मुलांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली.आहे त्याचे नाव एनपीएस वात्सल्य योजना आहे. ही योजना आज 18 सप्टेंबर 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते सुरु होणार आहे. ही एक पेन्शन योजना आहे. जी पेन्शन फ़ंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी द्वारे राबविली जाणार आहे. या योजनेत गुंतवणूक करून तरुण झाल्यावर मुलांसाठी मोठा फ़ंड एकत्र होईल. 

आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन एनपीएस वात्सल्य सब्स्क्रिप्शनसाठी एक पोर्टेल लॉन्च करणार आहे. या मध्ये या योजनेशी संबधित सर्व माहिती दिली जाणार आहे. या योजनेसाठी सब्स्क्रिप्शन घेणाऱ्या 18 वर्षाहून कमी असणाऱ्या मुलांना एक पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर(PRAN) कार्ड मिळणार आहे याचा अर्थ की आता मुलांना पेंशन मिळेल  ही योजना फ्लेक्सिबल काँट्रीब्युशन आणि इन्व्हेस्टमेंट ऑप्शन देते.

पालक मुलाच्या नावानी दरवर्षी 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकतील.कमाल गुंतवणुकीवर मर्यादा नसेल. कितीही रकम पालक मुलाच्या खात्यात जमा करू शकतात. नंतर मूल 18 वर्षाच्या होई पर्यंत पालकांना दरवर्षी मुलाच्या वत्सल खात्यात रकम जमा करावी लागणार. मोदी सरकार ने ही योजना मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक बळकटीसाठी सुरु केली आहे. 

आज दिल्लीत हा कार्यक्रम होणार असून पालक एनपीएस वात्सल्य लॉन्च कार्यक्रमात व्हिडीओकॉन्फरन्स द्वारे कनेक्ट होतील. 
Edited by - Priya Dixit