बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 20 डिसेंबर 2018 (09:23 IST)

३५ व्या संचार सॅटेलाईटचे यशस्वी उड्डाण

श्रीहरीकोटाच्या अंतराळ केंद्रातून ३५ व्या संचार सॅटेलाईटचे उड्डाण यशस्वीरित्या करण्यात आले आहे. GSAT-7Aअसे या उपग्रहाचे नाव आहे आणि इस्रोनो दिलेल्या माहितीनुसार संचार प्रणालीमध्ये सुधारणा आणण्याचे काम हे उपग्रह करणार असून याचा सगळ्यात जास्त फायदा इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी होणार आहे. संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी याचे प्रक्षेपण करण्यात आले. GSAT-7A हा उपग्रह पुढील आठ वर्षांपर्यंत कार्यरत राहाणार आहे. 
 
श्रीहरीकोटातून उड्डाण करणारे GSAT-7A हे ३५ वे उपग्रह आहे. हा उपग्रह K-U बँडच्या उपभोकत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. या उपग्रहाचे वजन २ हजार २५० किलोग्रॅम इतके आहे. देशातील संचारप्रणाली अधिक चांगली करण्यासाठी या उपग्रहाला अंतराळात सोडण्यात येणार आहे. यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे.