सुप्रिया सुळे लोकसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती
शरद पवार यांचा राजकीय वारस कोण असेल हे अजिन तरी स्वतः शरद पवार यांनी दाखवून दिले नाही. किंबहुना कोण होणार याचा इशारा सुद्धा दिला नाही. मात्र त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. संसदीय गटनेतेपदी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. याआगोदर तारिक अन्वर यांच्याकडे ही जबाबदारी होती. मात्र त्यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे हे पद रीक्त झाले होते. सुप्रिया सुळे लोकसभेवर दोनदा निवडून गेल्या आहेत. त्या बारामती या लोकसभा मतदारसंघाचे त्या प्रतिनिधीत्व करतात. सुप्रिया या स्वतः उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्रातून सर्वात जास्त प्रश्न विचारण्यामध्येही त्या आघाडीवर आहेत. नव्या जबाबदारीला उत्तम न्याय देतील, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची अपेक्षा आहे. इकडे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे राज्य विधीमंडळाचे पक्षनेते आहेत. त्यानंतर आता सुप्रिया सुळे संसदेच्या गटनेत्या झाल्या आहेत.