शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप

माजी परराष्ट्र मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन झाले आहे. प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये अर्थात 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी दुपारी साडेचार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले.
 
त्यांचं पार्थिव दुपारी 12 वाजेपर्यंत भाजपच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवलं गेलं. त्यानंतर लोधी रोडवरील विद्युतदाहिनीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी यांनी सुषमा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
 
सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह भाजप आणि इतर पक्षांच्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. हरियाणा सरकारने सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.