गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जून 2017 (10:55 IST)

सुषमा स्वराज यांनी सादर केले आपले रिपोर्ट कार्ड

मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण होत असल्याच्या, पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपलं रिपोर्ट कार्ड सादर केलं. यावेळी त्यांनी पाकिस्तान, चीन, अमेरिकेसह इतर देशांशी विविध मुद्द्यांवरुन भारतानं घेतलेल्या भूमिकेचं स्पष्टीकरण दिलं. पॅरिस करारावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टिप्पणीचा सुषमा स्वराज यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आर्थिक मदतीसाठी भारतानं पॅरिस कराराच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली नसल्याचं, स्वराज यांनी यावेळी स्पष्ट केलं.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने हवामन बदलासंबंधातील पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यामागे अमेरिकेच्या हितांना बाधा पोहचत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. पण यामुळे भारत आणि चीनला याचा सर्वाधिक फायदा होईल, असंही ट्रम्प यांनी सांगितलं होतं. यावरुन सुषमा स्वराज यांनी ट्रम्प प्रशासनाला सुनावलं आहे.