सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2024 (16:19 IST)

कॅनॉट प्लेसमध्ये संशयास्पद बॅग आढळला,बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी

दिल्लीच्या कनॉट प्लेस मध्ये शनिवारी एक संशयास्पद बॅग आढळला. या मुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दुपारी 2:41 च्या सुमारास हा बॅग आढळून आल्याचे पोलीसांनी सांगितले. पोलीस पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचले. परिसराला वेढा घातला आहे.  
 
बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु आहे. अग्निशमन दलाने देखील पाचारण केले आहे. 
पोलिसांनी सांगितले त्यानं ब्लॉक मध्ये एक बेवारस बॅग पडून असल्याची माहिती मिळाली या वरून पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठले पुढील तपास सुरु आहे. 

पोलिसांनी तत्काळ संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि बॉम्ब निकामी पथकालाही पाचारण केले. अग्निशमन विभाग आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मात्र, अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही.
बेवारस बॅग आढळल्यानंतर उपस्थित जमावाने फोटो काढायला सुरु केले आणि व्हिडीओ करू लागले. पोलिसांनी त्यांना तिथून जाण्यास सांगितले. आणि व्हिडीओ व फोटो काढण्यास मनाई केली. 
 
 
 
 Edited By- Priya Dixit