सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (11:07 IST)

काय सांगता,मुलीच्या पोटातून 2 किलो केस निघाले

लखनौ मध्ये एका किशोरवयीन मुलीच्या पोटातून शस्त्र क्रिया करून तब्बल 2 किलोचे केस काढले आहे.ही मुलगी 17 वर्षाची असून लहानपणा पासूनच मतिमंद आहे. लहानपणापासून ती केस खायची ही बाब घरातील लोकांना कळाली नाही गेल्या काही महिन्यापासून तिने जेवण कमी केले होते तसेच तिचे वजन देखील कमी झाले होते.तिला पोटात सतत दुखायचे आणि उलट्या व्हायच्या. त्यामुळे तिला कुटुंबातील सदस्यांनी डॉक्टर कडे नेले तिची तपासणी केल्यावर पोटात केस असल्याचे समजले. डॉक्टरांनी तिच्यावर शल्य क्रिया करून तिच्या पोटातून 2 किलो केस काढले आहे. शस्त्रक्रिये नंतर मुलीला शुद्ध आली असून तिच्या वेदनाही कमी झाल्या आहेत.
 
पोटातून केसांचा एवढा मोठा गोळा बघून सर्वानाच धक्का बसला आहे.ही मतिमंद मुलगी स्वतःचे केस खायची त्या मुळे तिचे केस कमी झाले होते आणि अशक्तपणा येऊन वजन देखील कमी झाले होते.तिच्या ओटीपोटात वेदना होत होती.त्यामुळे तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले डॉक्टरांनी एन्डोस्कोपी करून तिच्या पोटात केस असल्याचे निष्पन्न केले.नंतर तिच्या वर शस्त्रक्रिया करण्यात आली.आता तिची प्रकृती बरी असल्याचे सांगितले जात आहे.