शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (11:01 IST)

मान्सूनच्या परतीला होणार यंदा विलंब

अरबी समुद्रात झालेल्या हवामान बदलल्यामुळे आणि आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर, ओडिशालगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच क्षेत्रामुळे राज्यात पुढील चार दिवस वादळी वारसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामानातील बदलांमुळे राज्यात पुढील आठवड्यातही मान्सून सुरू राहण्याची शक्यता  वर्तवण्यात आली आहे.
 
कमी दाबाच्या क्षेत्रासह हवामानातील बदलांमुळे परतीच्या मान्सूनचा प्रवास यावर्षी उशिराने सुरू होईल. राजस्थानातून दरवर्षी 15 सप्टेंबरच्या सुमारास मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करतो.