बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 24 फेब्रुवारी 2020 (17:47 IST)

ट्रम्प दाम्पत्याने केली चरख्यावर सूत कताई

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात दाखल झाले आहेत. सुरुवातीला रोड शो केल्यानंतर त्यांनी महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या आणि त्यांची कर्मभूमी असलेल्या अहमदाबाद येथील साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प या दाम्पत्याने चरख्यावर सूत कताई देखील केली. 
 
ट्रम्प दाम्पत्याचे साबरमती आश्रमात आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांना खादीची शाल भेट देण्यात आली. दरम्यान, मोदींनी त्यांना या आश्रमाची माहिती दिली. यावेळी ट्रम्प दाम्पत्याने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर या आश्रमाचे महत्व मोदींनी त्यांना समजावून सांगितले.
 
दरम्यान, सुरुवातीला मोदींनी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांना चरख्यावर सूत कताई कशी करायची याची माहिती दिली. त्यानंतर आश्रमातील महिला सेवकांनी त्यांना चरख्यावर सूत काळजीपूर्वक कसं कातलं जात याचं प्रात्यक्षिक दाखवलं. त्यानंतर त्यांनी कताईची पद्धत समजावून घेत चरखाही चालवला.