मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 27 मार्च 2022 (10:35 IST)

हिजाबचा वाद शमतो न शमतो तोच आता मदरशांवरून पेटला वाद

कर्नाटकातील हिजाबचा वाद पूर्णपणे थांबलेला नसतानाच आता मदरशांवरून नवा वाद सुरू झालाय. कर्नाटकचे भाजप आमदार एमपी रेणुकाचार्य यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि शिक्षणमंत्र्यांना राज्यातील मदरसे बंद करण्याची विनंती केली आहे. मदरशांमध्ये देशविरोधी धडे दिले जातात, असा दावा त्यांनी केला आहे.

रेणुकाचार्य म्हणतात, "राज्यात मदरशांची काय गरज आहे? एकतर मदरशांवर बंदी घातली पाहिजे किंवा राज्यातील इतर शाळांमध्ये जे शिकवले जाते ते तिथे शिकवावे. अशा शाळा नाहीत का जिथे सर्व धर्माचे विद्यार्थी शिकतात."
 
हिजाबच्या वादावरून काही देशविरोधी संघटनांनी राज्यात बंदची हाक दिली आहे. हा इस्लामिक देश आहे का? हे आम्ही सहन करणार नाही. देशविरोधी संघटनांच्या कर्नाटक बंदचा काँग्रेस नेत्यांनी सभागृहात बचाव केला, असेही रेणुकाचार्य म्हणाले.