शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 20 जून 2023 (15:13 IST)

तरुण पिढीच्या बळावर बनारसी कारागिरांचे नशीब पुन्हा उजळेल

• नीता अंबानी यांनी ते करून दाखवले जे आम्ही करू शकलो नाही - बनारसी विणकर
• व्यवसाय वाढला तर तरुण पिढी या व्यवसायात सामील होईल - रामजी, बनारसी विणकर
• 'स्वदेश' सारखे प्रदर्शन कौशल्याला नवे रूप देईल – मोहम्मद हारून, बनारसी विणकर
 
 बनारसची विणकाम ही कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. काशीतील कारागिरांच्या बोटांची जादू येथील साड्या आणि कपड्यांमध्ये पाहायला मिळते. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधील 'स्वदेश' प्रदर्शनात या उत्कृष्ट कलाकृतीने रसिकांची मने जिंकली. बनारसी विणकाम करणारे मास्टर्स रामजी आणि मोहम्मद हारून यांनी जगभरातील ग्राहकांसमोर ही हस्तकला सादर केली. तरुण पिढी ही कला नव्या उंचीवर घेऊन जाईल, अशी आशा  त्यांनी बाळगली.
 
वाराणसीजवळ 25 हजार लोकसंख्या असलेल्या सराय मोहना गावातील बहुतांश लोक विणकराचे काम करतात. रामजीही याच गावातील रहिवासी आहे. . 'स्वदेश' प्रदर्शनाचा अनुभव सांगताना रामजी म्हणाले, “बनारसी साडी बनवण्यात किती वेळ आणि मेहनत लागते याची जगाला कल्पना नाही. इथे आल्यानंतर वाटले की, आपली कला अद्याप पूर्णपणे समोर आली नाही. बनारसी विणकाम जगभरातील ग्राहकांसमोर आणून नीता अंबानींनी आजपर्यंत जे आम्ही करू शकलो नाही ते करून दाखवले. असाच पाठींबा कायम राहिला तर तरुण पिढीही मोठ्या संख्येने या व्यवसायात येण्यास तयार आहे.”
 
'स्वदेश'ची लोकप्रियता आणि ग्राहकांची संख्या पाहून विणकर मोहम्मद हारूनलाही आनंद झाला. ते म्हणाले, “देशातील लोकांनी आमच्या कौशल्याचे भरभरून कौतुक केले आहे. अशा प्रदर्शनांमुळे कलाकारांना नवी ओळख मिळते. यातून कौशल्याची प्रगती नवीन स्वरूपात होईल आणि नवीन कारागीरही या क्षेत्रात येतील.
 
रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कला आणि संस्कृतीला वाढवण्याच्या कामाशी जुडलेल्या आहेत. कलेतील बारकावे पिढ्यानपिढ्या देऊन आणि कारागिरांना योग्य मोबदला मिळाल्यानेच कला जपली जाऊ शकते, असा विश्वास फाउंडेशनचा आहे. पारंपरिक व्यवसाय सांभाळण्यासाठी नव्या पिढीने पुढे यायला हवे.
 
कलाकार 'स्वदेश' सारख्या प्रदर्शनातून भारताची मौल्यवान संस्कृती आणि वारसा जपत असतानाच ते थेट ग्राहकांशी जोडले जात आहेत. प्रदर्शनात, श्रीमती अंबानी यांनी बनारसीचे प्रमुख कारागीर रामजी आणि मोहम्मद हारून यांच्यासह 'स्वदेश' ला आलेल्या कलाकारांची भेट घेतली, त्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले आणि फाऊंडेशनच्या पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.





Edited by - Priya Dixit