1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified मंगळवार, 19 मे 2020 (10:56 IST)

धमाकेदार ऑफर: BSNL रिचार्चवर ४ टक्क्यांची सुट आणि प्रत्येक कॉलवर कॅशबॅक

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL च्या ग्राहकांसाठी कंपनीने आपल्या ६ पैसे कॅशबॅकच्या ऑफरची मुदत ३१ मे पर्यंत वाढवली आहे. कंपनीने लँडलाईनवर कॉल करणाऱ्या ही ऑफर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाँच करण्यात आली होती. जाणून घेऊ ही ऑफर बद्दल-
 
या ऑफरअंतर्गत एखाद्या ग्राहक जेव्हा पाच मिनिटांपेक्षा अधिक कालावधीसाठी लँडलाईनवर कॉल करत असेल तर त्याला ६ पैशांचा कॅशबॅक देण्यात येतो. यासाठी ‘ACT 6 paisa’ असा मेसेज टाईप करून तो 9478053334 या क्रमांकावर पाठवावा लागतो. ही कॅशबॅक ऑफर बीएसएनएल वायरलाईन, ब्रॉडबँड आणि फायबर टू होम ग्राहकांसाठीदेखील उपलब्ध आहे. कंपनीनं आपल्या तामिळनाडू बीएसएनएलच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली. 
 
तसेच दुसरीकडे लॉकडाउनमध्ये ग्राहकांच्या मदतीसाठी BSNL ने रिचार्ज अमाऊंटवर ४ टक्क्यांची सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्यांचा BSNL अकाऊंट रिचार्ज करणाऱ्याला ही सुट देण्यात येणार आहे.