Infinix Note 5 Stylus भारतात झाला लाँच, गॅलॅक्सी नोट 9 प्रमाणे मिळेल पेनचा सपोर्ट
इनफिनिक्स इंडियाने भारतात आपला नवीन स्मार्टफोन इनफिनिक्स नोट 5 स्टाइल्स स्मार्टफोन लाँच केला आहे. फोनची लाँचिंग सोमवारी नवी दिल्लीत एका इवेंटमध्ये दुपारी 12 वाजता झाली. या फोनचे वैशिष्ट्य बघितले तर यात सॅमसंग गॅलॅक्सी नोट सिरींजचा स्मार्टफोनप्रमाणे पेनचा सपोर्ट देण्यात आला आहे. इनफिनिक्सने फोनसोबत लाँच केलेल्या पेनला एक्स पेन असे नाव दिले आहे. सांगायचे म्हणजे सॅमसंगच्या नोट सिरींजच्या पेनचे नाव एस पेन आहे.
इनफिनिक्स एक्स पेनच्या मदतीने तुम्ही फोनच्या मेनूला ओपन करू शकता. त्याशिवाय तुम्ही याच्या मदतीने नोटपॅडवर काही लिहू शकता. तुम्ही एक्स पेनच्या माध्यमाने ड्रॉइंग देखील काढू शकता आणि स्क्रीनशॉटपण घेऊ शकता. इनफिनिक्स नोट 5 स्टाइल्सच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलण्यात झाले तर फोनमध्ये 5.93 इंचीचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे ज्याचा आस्पेक्ट रेशियो 18:9 आहे. डिस्प्लेवर 2.5D ग्लासचे प्रोटेक्शनपण आहे. फोनची बॉडी मेटलची आहे. फोनमध्ये एंड्रॉयड ओरियो 8.1 (एंड्रॉयड वन) सोबत गूगल लेंस आणि गूगल असिस्टेंटचा देखील सपोर्ट मिळेल.
फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे ज्यात एआय पोट्रेट सारखे फीचर्स मिळतील. तसेच फ्रंट कॅमेरापण 16 मेगापिक्सलचा आहे. फ्रंट कॅमेरेसोबत पोट्रेट मोड मिळेल. कॅमेर्यासोबत स्लो मोशन आणि टाइम लॅप्स व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा देखील मोका मिळेल. यात 4000mAh ची बॅटरी आहे ज्याबद्दल कंपनीचा दावा आहे की 1 तासात बॅटरी फूल चार्ज होईल.
कनेक्टिविटीची गोष्ट केली तर यात डुअल सिम 4जी वीओएलटीई सपोर्ट आहे. या फोनमध्ये मीडियाटेचे MTK P23 ऑक्टाकोर प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी ARM Mali G71 आहे. हा फोन 4GB + 64GB च्या वेरियंटमध्ये मिळेल. त्याशिवाय फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरसोबत फेस अनलॉक देखील मिळेल. फोनची किंमत 15,999 रुपये आहे आणि याची विक्री 4 डिसेंबरापासून फ्लिपकार्टवर होईल. हा फोन 2 कलरमध्ये मिळेल. फोनसोबत जियोकडून 2200 रुपयांचा कॅशबॅक आणि डाटा मिळेल.