शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (09:17 IST)

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे दोन्ही फोन ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे तिन्ही स्मार्टफोन ६ ते १४ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने आपले Poco F1 हे मॉडेल लाँच केले. त्यानंतर आता कंपनीने आपले पुढील मॉडेल्स लाँच केली आहेत. यात Redmi6,Redmi 6A आणि Redmi 6 Pro यांचा समावेश आहे. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि एमआयच्या अधिकृत वेबसाईटवर हे फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. त्यासाठी नोंदणी सुरु झाली आहे. मोबाईलची अधिक माहिती अशी 
 
रेडमी सहा (Redmi 6)
सिस्टीम – अँड्रॉईड ८.१ ओरियो, स्क्रीन – ५.४५ इंचाची एचडी प्लस, प्रोसेसर – क्वाड-कोर मीडियाटेक हीलियो ए22, कॅमेरा – १२ आणि ५ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, किंमत -  ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी ८४०० रुपये तर  ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरीचा १०,५०० रुपये आहे.
 
रेडमी सहा ए (Redmi 6A)
Redmi 6A च्या २ जीबी रॅम आणि १६ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत ६,३०० रुपये,  Redmi 6 Pro हा फोन १०,४०० रुपये. यात युजरला ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी मिळेल. सिस्टीम – अँड्रॉईड ८.१ ओरियो, स्क्रीन – ५.४५ इंचाची एचडी प्लस, प्रोसेसर – २ गिगाहार्टस ऑक्टा कोअर हिलीयो पी २२, कॅमेरा – १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. 
 
शोओमी रेडमी ६ प्रो (Xiaomi Redmi 6 Pro)
स्क्रीन – ५.८४ इंचाची फुल एचडी प्लस डिस्प्ले, प्रोसेसर – ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन ६२५, कॅमेरा – १२ आणि ५ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, किंमत -  ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असलेला Redmi 6 Pro १३,६०० रुपये.