रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (09:16 IST)

6 जीबी रॅम असलेला मोटो जी 6 स्मार्टफोन भारतात लॉंच

मोटोने त्याचा मोटो जी 6 स्मार्टफोन भारतात लॉंच  केला आहे. मोटो जी 6 हा ड्युअल सिमचा स्मार्टफोन आहे. यामध्ये 5.93 इंचचा फुल डिस्प्ले देण्यात आलाय. हा फोन 8.0 ओरियो अॅण्ड्रॉइड ऑपरेटींग सिस्टिमवर काम करेल.  फोनमध्ये 630 Soc का ओक्टाकोर स्नैपड्रेगन प्रोसेसर असून 6 जीबी रॅम तसेच ड्युअल रिअर कॅमेराही आहे. याचा सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सल आहे. याला इनबिल्ट मेमरी 64 जीबी रॅम असून 128 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. याशिवाय 4G LTE, वायफाय, ब्लूटूथ 5.0, यूसीएबी टाइप सी, एनएफसी, आणि 3.5 एमएमचा जॅक आहे. फोनमध्ये 3,200 एमएएचची बॅटरी असून याचं वजन 165 ग्रॅम आहे. यामध्ये फिंगरप्रिंट सेसंर असून फोन डॉल्बी ऑडियो सपोर्टदेखील दिला आहे. या  मॉडेलची किंमत 22,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन अमेझॉनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. फोनची मूळ किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 'अमेझॉन' वर 1500 रुपयांच्या डिस्काऊंटमध्ये आहे.