गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 22 नोव्हेंबर 2018 (16:30 IST)

रेडमी नोट 6 प्रो 13,999 रुपयांमध्ये लाँच, यात आहे चार कॅमेरे आणि दोन दिवसाचा बॅटरी बॅकअप

चिनी कंपनी Xiaomi ने भारतीय मोबाइल बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Redmi Note 6 Pro लाँच केला आहे. या फोनमध्ये एकूण चार कॅमेरे देण्यात आले असून दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. या फोनची सुरुवाती किंमत 13,999 रुपये आहे. कंपनीने या  स्मार्टफोनला रेडमी नोट 5 प्रोच्या यशानंतर लाँच केला आहे. शाओमी रेडमी नोट 6 प्रो स्मार्टफोनची सेल 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.  इच्छुक यूजर याला फ्लिपकार्ट आणि शाओमीच्या आधिकारिक वेबसाइट mi.com हून विकत घेऊ शकतात. यात 5जी वायफाफ सपोर्ट देखील आहे.
 
4 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 13,999 रुपये 
6जीबी रॅम व 64 जीबी वेरिएंटची किंमत 15,999 रुपये
 
काय आहे स्पेसिफिकेशन 
या स्मार्टफोनने कंपनीने फ्रंटमध्ये 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे. जेव्हाकी बॅक पॅनल 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा का डुअल रियर कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगन 636 ऑक्टाकोर प्रोसेसर दिले आहे. कंपनीने यात  4000 एमएएचची बॅटरी दिली आहे. यात 6.26 इंचेचा नॉच डिस्प्ले देखील देण्यात आले आहे. यात हायब्रीड मेमरी कार्ड स्लॉट आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही डुअल सिम आणि मेमरी कार्ड एकत्र उपयोग नाही करू शकाल. फोनमध्ये 5.0 ब्लूटूथची सुविधा आहे.