1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified मंगळवार, 9 मार्च 2021 (09:30 IST)

पुण्यात आणखी २० सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रांची पडली भर

पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने पालिकेकडून गेल्याच आठवड्यात ४२ सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र घोषित करण्यात आली होती. त्याचा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये आणखी २० सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रांची भर पडली असून एकूण संख्या ६२ झाली आहे. पालिकेच्या १५ पैकी ११ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्वाधिक मायक्रो कंटेन्मेंट झोन औंध-बाणेरमध्ये असून सर्वाधिक ‘हॉटस्पॉट’ शिवाजीनगर परिसरात आढळून आले आहेत. 
 
क्षेत्रीय कार्यालय सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आणि हॉटस्पॉट क्षेत्रीय कार्यालय प्रतिबंधित क्षेत्र 
 
औंध-बाणेर - १९  -- 
शिवाजीनगर - ०८  ०४
कोंढवा-येवलेवाडी - ०८  ००
हडपसर-मुंढवा - ०७  
कसबा-विश्रामबाग - ०६  ०३ 
नगररस्ता - ०५  ०१ 
बिबवेवाडी - ०५   
वारजे - ०३  ०१ 
भवानी पेठ - ०१  
एकूण - ६२  ०९