सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 3 मे 2021 (16:52 IST)

धन्य, वडिलांचा मृत्यू, आई व भाऊ रुग्णालयात आहेत, तरी कर्तव्यावर पुण्यातला डॉक्टर

मागील वर्षापासून सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी परिस्थितीला खंबीरपणे लढा देत आहे. अशात खाजगी जीवनात कितीही उलथापालथ होत असली नियतीच्या परीक्षेला सामोरां जावून कर्तव्य कसं बजावयाचं याचं जिवंत उदाहरण म्हणजे पुण्यातल्या संजीवन हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसीन स्पेशलिस्ट डॉक्टर मुकुंद पेणुरकर. 
 
डॉ. पेणुरकर यांच्या वडिलांचा कोविड-19 मुळे 26 एप्रिलला पुण्यात मृत्यू झाला. त्यांची आई आणि लहान भाऊ दोघेही संजीवन हॉस्पिटलमध्येच कोविडशी झुंज देत आहेत. अशा कठीण परिस्थितीतही डॉक्टरांनी 26 एप्रिलला संध्याकाळी स्मशानभूमीत जाऊन एकट्याने वडिलांचे अंत्यसंस्कार केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा संजीवन हॉस्पिटलमध्ये कर्तव्यावर रूजू झाले. 
 
या सर्व घटनेबद्दल डॉ. मुकुंद पेणुरकर म्हणाले, माझे वडील वाचू शकले नाही याचं प्रचंड दु:ख आहे परंतू माझं कर्तव्य पार पाडून इतर कोविड रुग्णांचा जीव वाचवणे कर्तव्य आहे. कोविड रुग्णांचा जीव वाचवला तर तीच माझ्या वडिलांना योग्य श्रद्धांजली ठरेल, असेही ते म्हणाले.
 
संजीवन हॉस्पिटलमध्ये गेल्या 10 वर्षांपासून काम करत असलेले डॉ. पेणुरकर मूळचे नागपूरचे आहेत. त्यांचे आई-वडिल नागपूरला लहान भावाकडे असताना 17 एप्रिलला त्यांच्या भावाला कोरोनाची लागण झाली. नंतर त्यांचे आई-वडिलही कोविड पॉझिटिव्ह झाले. दुर्दैवानी तिघांचीही स्थिती गंभीर असल्यामुळे आणि नागपूरमध्ये बेड उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाला कार्डियॅक अँब्युलन्सने पुण्यात संजीवन हॉस्पिटलमध्ये आणलं. वडिलांची परिस्थिती खूपच खालावली होती. शेवटी कोविडसह इतर कॉम्पिकेशन्समुळे वडिलांचं निधन झालं. एकीकडे वडील गेल्याचं दु:ख तर दुसरीकडे आई आणि भाऊ मृत्यूशी झुंज देत असताना सध्याची परिस्थिती बघता ते तातडीने हॉस्पिटलमध्ये रूजू झाले.
 
डॉक्टर पेणुरकर हे पुण्याच्या फिजिशियन्स असोसिएशनचे सचिव आहेत. अशा कोरोना योद्धाला सलाम.