गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 1 मे 2021 (22:51 IST)

लसींची मागणी करत सीरम संस्थेचे सीईओ आदर पूनावाला यांना धमक्यांचे फोन

भारतात, कोविशील्ड लस मोठ्या प्रमाणात तयार करणार्‍या कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ आदर पूनावाला यांना धमकी देणारे कॉल येत आहेत. लंडनमधील टाइम्स यूकेला दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी असा आरोप केला आहे की भारताचे काही ताकदवान नेते आणि व्यावसायिक त्यांना फोनवर धमकावत आहेत. त्यापैकी या मध्ये काही राज्यांच्या  मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. कोविशील्ड त्वरित द्यावा, अशी सर्वांची मागणी आहे.
 
बुधवारी पूनावाला यांना Yश्रेणीची सुरक्षा देण्यात आली. केंद्रसरकारच्या अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पूनावाला यांना सुरक्षा देण्यात आली होती. आता सीआरपीएफ चे 4 -5 कमांडोसमवेत 11 सुरक्षाकर्मी त्यांचा सोबतीला असतील.त्यांना ही सुरक्षा संपूर्ण देशात मिळेल. 
 
पूनावाला म्हणाले की,अशा प्रकारचे धमक्यांचे फोन कॉल्स येणं समजण्याचा पलीकडे आहे. माझ्यावर लस पुरवठा करण्याचा दबाब  आणला जात आहे. 
ते म्हणतात की, फोन करणारे म्हणतात की जर आम्हाला लसचा पुरवठा दिला नाही तर चांगले होणार नाही.अश्या प्रकारे धमक्या देत आहे. त्यामुळे आम्हाला काम करण्यात अडथळे येत आहे. आम्ही योग्य प्रकारे काम करू शकत नाही. 
सध्या पूनावाला लंडन मध्ये आहे. ते म्हणाले, की मी येथे बरेच दिवस राहणार असून आता भारतात परत यायचे नाही.माझ्या खांद्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली आहे पण मी एकट्याने हे करू शकत नाही.  
 
28 एप्रिल रोजी सीरमने कोविशील्डची किंमत कमी केली. पूनावाला यांनी ट्विटवरून ही माहिती दिली. ते म्हणाले की राज्यांना 400 रुपये ऐवजी 300 रुपयात ही लस मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यात हजारो कोटी रुपयांची बचत होईल. तसेच ते अधिकाधिक लस खरेदी करण्यास सक्षम होतील आणि या मुळे हजारो लोकांचे प्राण वाचू शकतील.