शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 18 डिसेंबर 2023 (20:33 IST)

ड्रग्जमाफिया ललित पाटीलची पुन्हा ऑर्थररोड कारागृहात रवानगी

lalit patil
पुण्याच्या ससून रुग्णालयातून एमडी ड्रग्जचे रॅकेट चालविणाराबहुचर्चित ड्रग्जमाफिया संशयित ललित पाटीलसह तीन संशयितांचा दहा दिवसांचा नाशिकचा पोलीस कोठडीतील मुक्काम संपला. जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे आता पुन्हा मुंबईच्या ऑर्थररोड कारागृहात त्यांची रवानगी केली जाणार आहे.
 
एमडी ड्रग्ज व ससून प्रकरणातील संशयित ललित पाटीलसह त्याचे साथीदार संशयित रोहित चौधरी, जिशान शेख, हरिशपंत या तिघांचा ताबा नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या शुक्रवारी घेतलाहोता. त्यांना चोख बंदोबस्तात शनिवारी पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयापुढे हजर केले होते. न्यायालयाने या चौघांना थेट १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी  पोलीस कोठडी संपल्याने त्यांना दुपारी पुन्हा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायाधीश यु.जी.मोरे यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत चौघांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली.

सरकारपक्षाकडून न्यायालयाला न्यायालयीन कोठडीचा रिपोर्ट सादर करण्यात आला होता. यामुळे आता या चौघांना मुंबई पोलिसांच्या हवाली केले जाणार असून त्यांची ऑर्थररोड कारागृहात रवानगी केली जाणार आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor