रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (15:33 IST)

पुण्यात चोरट्यांनी मारला लेफ्टनंट कर्नलच्या घरातील दारुच्या बाटल्यांवर डल्ला

मिलटरी कॅन्टिनमध्ये असलेल्या अस्सल आणि स्वस्त दारुचा स्टॉक  मिळावा असा अनेकांचा प्रयत्नही असतो. बाहेर दारु कितीही मिळत असली तरी मिलटरी कॅन्टिनमधील दारुविषयी अट्टल शौकिनांना कायमच आकर्षण राहिले आहे. लष्करी अधिकार्‍यांच्या घरात काही नसले तरी दारुचा खास स्टॉक असतो, असे समजले जाते. खडकीतील एका घरफोडीच्या गुन्ह्यात हा समज खरा ठरला आहे.

चोरट्यांनी एका लेफ्टनंट कर्नल याच्या घरातून तब्बल दारुच्या १५ बाटल्या घरफोडी करुन लंपास केल्या आहेत.याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या लेफ्टनंट कर्नल यांनी खडकी पोलीस ठाण्यातफिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लेफ्टनंट कर्नल खडकीतील डंकन रोडवर राहतात. ३ ते ९ नोव्हेबर दरम्यांन त्यांचा फ्लॅट बंद होता.चोरट्यांनी फ्लॅटचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला.हॉलमधील व बेडरुममधील कपाटातील चांदीची भांडी व १५ दारुच्या बाटल्या असा ५६ हजार रुपयांचा माल चोरुन नेला.सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.