शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 9 जानेवारी 2022 (16:28 IST)

पुण्यात न्यूड फोटोग्राफी प्रदर्शन वरून नवा वाद,

पुण्यात न्यूड फोटोग्राफीच्या प्रदर्शनावर नवा वाद सुरु झाला आहे. पुण्यातील बाल गंधर्व दालनात नव तरुण छायाचित्रकार असलेल्या साताऱ्यातील अक्षय माळी याने न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवल्याने काही लोकांच्या रोषाला सामोरी जावे लागत आहे. अक्षय नावाच्या या कलाकाराला धमक्याचे फोन फोन येत आहे. अक्षय यांनी पुण्यातील सिम्बॉयसिस स्कूल ऑफ फोटोग्राफी मधून शिक्षण घेतले आहे. लोकांचा न्यूड फोटोग्राफी बद्दलचे  मत बदलावे  या साठी त्यांनी पुण्याच्या बाल गंधर्व कला दालनात न्यूड फोटोग्राफीचे 3 दिवसीय  प्रदर्शन भरविले होते. त्यात मला एक निनावी फोन आला त्यात अज्ञाताने तातडीने हे प्रदर्शन बंद करा अन्यथा आंदोलन केले जाईल. अशी धमकी दिली. नंतर बाल गंधर्व व्यवस्थापनाने देखील हे प्रदर्शन पाहण्यास नागरिकांना रोखले. असे अक्षय यांनी सांगितले. हे प्रदर्शन भरविण्यासाठी मी रीतसर परवानगी देखील घेतली होती. मात्र तरीही बाल गंधर्व व्यवस्थापनाच्या अशा कृतीमुळे अक्षय माळी यांचे प्रदर्शन पुढे सुरु ठेवायचे की नाही याची वाट अक्षय पाहत आहे.