रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (16:44 IST)

आता 1991 रुपयांत विमानाने पुणे ते गोवा, सिंधुदुर्ग थेट प्रवास 31 ऑगस्ट पासून सुरु

पुणे पासून गोवा आणि सिंधुदुर्ग साठी 31 ऑगस्ट पासून थेट विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. ही सेवा आठवड्यातून दोन दिवस शनिवार आणि रविवारीच होणार आहे. ही विमानसेवा गोव्यातील विमान कंपनी फ्लाय 91 तर्फे करण्यात आली आहे. फ्लाय 91 ही कंपनी मूळ गोव्याची आहे.

या कंपनीने काही महिन्यांपूर्वी विमानसेवा सुरु केली असून गोवा, आगात्ती, हैद्राबाद, जळगाव, बंगळुरू, पुणे, सिंधुदुर्ग शहराला जोडणाऱ्या विमानसेवेची घोषणा केली असून या सेवेचा शुभारंभ गोवा, हैद्राबाद, जळगाव, बंगळुरू आणि आगात्ती या ठिकाणी करण्यात आला. आता ही विमानसेवा पुणे शहरासाठीयेत्या 31 ऑगस्ट पासून सुरु करण्यात येत आहे. 
 
उत्तर गोव्यातील मोप येथे विमानतळावरून सकाळी 6:15 वाजता पुण्याचे विमान उड्डाण करेल. आणि सकाळी 7:40 वाजता पोहोचेल. तर पुण्याहून गोव्यासाठी हे विमान सकाळी 10:55 वाजता उड्डाण करेल.
तर पुण्यातून सिंधुदुर्गसाठी हे विमान सकाळी 8:05 वाजता सुटेल आणि सकाळी 9:10 वाजेच्या सुमारास पोहोचेल. 
नन्तर सिंधुदुर्गवरून पुण्यासाठी हे विमान सकाळी 9:30 वाजता सुटेल आणि 10:35 वाजेच्या सुमारास पुण्याला पोहोचेल. 
ही विमान सेवा सिंधुदुर्ग आणि गोव्यासाठी थेट असल्यामुळे तसेच सुट्टीच्या दिवशी असल्यामुळे प्रवाशांना प्रवासाचा आनंद घेता येणार असून हे प्रवाशांसाठी सोयीस्कर असणार आहे. 
Edited by - Priya Dixit