गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (18:19 IST)

Pune स्कूल बसचा भीषण अपघात

accident
पुण्यातील आयुका केंद्र पाहण्यासाठी गेलेल्या स्कूल बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात किमान 44 विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे विद्यार्थी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेचे विद्यार्थी आहेत. 
 
 येथील शाळेची बस मौजे गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेली होती, मात्र, यादरम्यान ही बस दरीमध्ये कोसळली. यावेळी बसमध्ये 44 विद्यार्थी व 3 शिक्षक होते. सर्वांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना वैद्यकीय सुविधा देण्यात आली आहे.