शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जानेवारी 2022 (15:19 IST)

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोना

पुण्यात १ जानेवारीपासून रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. त्यातच आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. लक्षणे जाणवत असल्याने टेस्ट केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे. 
 
महापौर म्हणाले, कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेन. अशी माहिती त्यांनी ट्विटर वरून दिली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना झाला होता. त्यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेतले होते.