शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जुलै 2023 (15:30 IST)

Pune : रेनकोट कुठंय बाप्पाचा? विचारणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल

लहान मुले किती निरागस आणि गोंडस असतात. कधी कधी आपल्या प्रश्नांनी ते मोठ्यांना देखील निरुत्तर करतात. सध्या सोशल मीडियावर एका निरागस चिमुकल्याने विचारलेला प्रश्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
 
असं म्हणतात मुले हे देवाघरची फुले असतात. त्यांचे बोबडे बोल, निरागसपणा, हसणं हे बघतात मोठ्यांना आनंद होतो. असाच एक लहान मुलाचा आपल्या लाडक्या बाप्पाची काळजी घेणारा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चिमुकला आपल्या वडिलांना गणपतीच्या  रेनकोट बद्दल विचारणा करत आहे.