18,19, 20 तारखेला पुणेकरांचे मोबाईल फोन स्विच ऑफ होणार?
पुणे हे विद्येचे माहेर घर म्हटले जाते. पुणे हे नेहमीच चर्चेत असते. सध्या पुण्याच्या एका पोस्टरमुळे ते पुन्हा चर्चेत आहे. या पोस्टरवर 18, 19, 20, जानेवारीला सायंकाळी 6 ते 9 च्या दरम्यान पुण्याच्या 1 लाख लोकांचे मोबाईल स्विच ऑफ होणार आहे. हे पोस्टर सगळीकडे व्हायरल झाले असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
व्हायरल पोस्टर मध्ये 18, 19, 20 जानेवारी सायंकाळी 6 ते 9 मध्ये किमान एक लाख मोबाईल स्विच ऑफ होणार असे लिहिले आहे. या पोस्टर मध्ये कारण किंवा कोणत्याही कंपनीचे नाव दिलेले नाही.या पोस्टर मुळे नागरिकांमध्ये भीती आहे. अखेर कोणी हे पोस्टर लावले आहे हा मोठा प्रश्न पडला आहे.असे वस्त्रे अनेक ठिकाणी लावण्यात आले आहे. पण असे काहीही होणार नाही. त्याचे खरे कारण असे आहे की असेच एक पोस्टर पुन्हा व्हायरल होत आहे या वर लिहिले आहे की 18, 19, 20 जानेवारी रोजी , सायंकाळी 6 ते 9 किमान 1 लाख पुणेकर मोबाईल बंद करुन स्वत:शीच संवाद साधतील. डॉ. कुमार विश्वास… श्री राम ऊर्जा कानावर… मनावर!” डॉ. कुमार विश्वास हे श्री रामाबद्दल संवाद साधतील.याचे पोस्टर देखील व्हायरल झाले आहे. me_ashi_kashi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हे सर्व व्हिडीओ शेअर करण्यात या आहे.