रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (08:24 IST)

कमी दर्जाच्या मद्याची ब्रँडेड बाटल्यांमधून विक्री; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

कमी दर्जाच्या मद्याची विविध ब्रँडेड कंपन्यांचे लेबल लावलेल्या बाटल्यांमधून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने  पिंपळे सौदागर येथे कारवाई करून सहा लाख 71 हजार 895 रुपयांचा मद्यासाठा जप्त केला. याप्रकरणी कांजी शामजी पटेल याला  अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. पिंपळे सौदागरच्या हद्दीत झिंजुर्डे चाळीत पत्र्याच्या खोलीत आरोपी पटेल हा बनावट दारु बाटल्यांमध्ये भरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करण्यात आली. आरोपी कांजी याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. कमी प्रतीचे मद्य उच्च प्रतीच्या रिकाम्या स्कॉचच्या बाटल्यांमध्ये भरून बनावट स्कॉच व विदेशी मद्याची विक्री करीत होता. विविध ब्रँडच्या 65 सीलबंद बाटल्या तसेच विविध ब्रँडच्या उच्च प्रतीच्या 724 रिकाम्या बाटल्या, बुचे, लेबले, इत्यादी साहित्य असा एकूण सहा लाख 71 हजार 895 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.