रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 31 मे 2020 (11:08 IST)

पुणे विभागात सॅनिटायझर फक्त 'या' दुकानात मिळणार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता हे सॅनिटायझर किराणा दुकान, जनरल स्टोअर्समध्ये विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यात हॅण्ड सॅनिटायझरवर बंदी घालण्यात आली आहे. दुकानांमध्ये सॅनिटायझरची विक्री केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 
 
अन्न-औषध प्रशासन विभागाचे विभागीय सहआयुक्त सुरेश पाटील यांनी याबाबत निर्देश दिले.हॅण्ड सॅनिटायझर हे औषध या प्रकारात मोडत असल्याने खरेदीही मान्यताप्राप्त परवानाधारक दुकानातूनच करावी. खरेदी करताना पक्क बिल घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विक्री ही फक्त किरकोळ औषध विक्रेते, छोटे औषध परवानाधारक, शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांना करण्याचे निर्देश आहेत.