भयंकर, लहान मुलाची हत्या करून मृतदेह पोत्यात बांधून ठेवला
पुण्यातल्या कोथरुडमधल्या एकलव्य पॉलिटेक्निक कॉलेज मैदानाजवळ एका 12 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवण्यात आला होता. मृत मुलगा हा विशेष मुलगा होता.
या प्रकरणी पिंटू गौतम या 35 वर्षांच्या आरोपीला अटक करण्यात आलं आहे. आरोपी हा मृत मुलाच्या शेजारी राहतो. आरोपी हा परराज्यातील असून पुण्यात तो आपल्या भावासोबत राहतो. मृत मुलाला खाऊचं आमिष दाखवून आरोपीने मुलाला कॉलेजच्या मैदानाजवळ नेलं. आणि तिथे त्याची हत्या केली.
संध्याकाळी मैदानावर काही मुलं खेळत असताना त्यांना पोत्यात काहीतरी बांधून ठेवलेलं दिसंलं. मुलांनी पोतं उघडून पाहिल्यावर आतमध्ये त्यांना मृतदेह आढळला. याबाबत त्यांना तातडीने पोलिसांना ही माहिती दिली. धक्कादायक म्हणजे मुलाच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्यामुळे अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत.