बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 एप्रिल 2022 (08:23 IST)

पुण्यातील वातावरण तापणार, राज ठाकरे पुणे दौऱ्यावर

raj thackeray
मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता 16 एप्रिलला पुणे दौऱ्यावर जात आहेत.  राज यांच्या दौऱ्यावेळी सामुहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.
 
राज्यातील राजकारण तापलेलं असताना आणि राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसकडून मनसेवर जोरदार हल्ला चढवला जात असताना राज ठाकरे यांचा पुणे दौरा घोषित करण्यात आलाय. राज ठाकरे 16 एप्रिलला पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. राज यांच्या दौऱ्यावेळी सामुहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. खालकर चौक मारुती मंदिराजवळ हा कार्यक्रम होणार असून, मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आणि कार्यकर्त्यांना हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिल्यानंतर पुण्यात अशाप्रकारचा सामुहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलं आहे.