सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (11:04 IST)

पुण्यातील चांदणी चौकातला पूल पाडण्यात आला

पुण्यातील  मुंबई- बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौक पूल वाहतूक कोंडी मुळे पाडण्याचा निर्णय घेण्यात आला असून चांदणी चौकातील पूल  काल मध्यरात्री नंतर जमीनदोस्त करण्यात आला. रात्री एक वाजेच्या सुमारास पूल मध्ये स्फोट करण्यात आला. पुलाचा काही भाग स्फोटात पडला नसल्यामुळे पोकलेनच्या साहाय्याने पाडण्यात आला. सध्या वाहतूक बंद करण्यात आली असून उध्वस्त पुलाचे अवशेष काढल्यावर महामार्ग सुरु करण्यात येईल. चांदणी चौक परिसरात सकाळी आठ वाजे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. उध्वस्त पुलाचे अवशेष अन्यत्र हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. मार्ग मोकळा झाल्यावर या महामार्गावर वाहतूक सुरु करण्यात येईल.तो पर्यंत वाहतूक बंद असणार आहे. 

पूल पाडण्याचे कंत्राट नोएडा येथील जुळे मनोरे तसेच बोरघाटातील अमृतांजन पूल पाडणाऱ्या कंपनीला देण्यात आले. पूल पाडण्यासाठी तब्बल 600 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. कंपनीच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी पुलाच्या परिसराची पाहणी केली नंतर स्फोटके भरण्यासाठी पुलात छिद्र पाडण्यात आले सुमारे 1300 छिद्र केले गेले. 
पुलावरील वाहतूक शनिवारी रात्री थांबविण्यात आली.पूल पाडण्यासाठी चांदणी चौकातील परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला. एकही मनुष्याला परिसरात येण्याची बंदी घालण्यात आली. पूल पाडण्यासाठी रात्री आठ वाजेपासून तांत्रिक काम सुरु केले.पुलाला झाकून ठेवण्यात आले जेणे करून स्फोटका नंतर पुलाचे अवशेष  उडून जाऊ नये. ड्रोन कैमेऱ्याने परिसराची पाहणी करण्यात आली. संपूर्ण परिसर निर्मनुष्य असल्याची खात्री केल्यावरच 1,350 डिटोनेटरच्या सहाय्याने नियंत्रित स्फोटाद्वारे पूल पाडण्यात आला. दहा आकड्यांचा काऊंटडाऊन सुरू करण्यात आली आणि ती पूर्ण होताच 30 मीटर लांबीचा हा पूल इतिहासजमा झाला. स्फोटानंतरही  संपूर्ण पूल पडला नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर जेसीबी व पोलकेलनच्या मदतीने पुलाचा लोखंडी सांगडा व राहिलेला भाग पाडण्यात आला. 

पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी 16 एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, 30 टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, दोन अग्निशमन वाहने, तीन रुग्णवाहिका, दोन पाण्याचे टँकर वापरण्यात आले.   
 
Edited By -Priya Dixit