बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 23 जून 2020 (16:14 IST)

लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणार्‍या खासदारांमध्ये पहिले तीन महाराष्ट्रातील

लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणार्‍या देशातील टॉप फाईव्ह खासदारांमध्ये पहिले तीन खासदार हे महाराष्ट्रातील आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत तर, त्यांच्या पाठोपाठ सुभाष भामरे (धुळे), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर), सुधीर गुप्ता (मध्य  प्रदेश) आणि बिद्यु महतो (जमशेदपूर) यांचा समावेश आहे. 
 
पुण्यातील परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने ऑनलाइन पत्रकार परिषदेत या बाबतची माहिती दिली. लोकसभेतील अपडेटसची 31 मे पर्यंतची दखल संस्थेने घेतली  आहे, अशी माहिती परिवर्तनच्या अध्यक्षा अंकिताअभ्यंकर, समन्वक तन्मय कानिटकर आणि सायली दोडके यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच खासदार सुप्रिया सुळे यांनी तब्बल 212 प्रश्न लोकसभेत उपस्थित केले आहेत. तर धुळ्याचे भाजपचे खासदार सुभाष भामरे यांनी 202 आणि शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही 202 प्रश्न उपस्थित केले आहेत. 
 
मध्य प्रदेशातील मंदसौर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार सुधीर गुप्ता यांनी 198 तर झारखंडधील जमदेशपूर मतदारसंघातील भाजपचे खासदार बिद्युत महतो यांनी 195 प्रश्न विचारले आहेत.