शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (14:44 IST)

पुण्यात पहिली ते आठवीपर्यंत शाळा पूर्ण वेळ सुरु होणार

पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरु झाली आहे. त्यावेळेस शाळा हाफ डे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुण्यात पहिली ते आठवीपर्यंत शाळा पूर्ण वेळ सुरु होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. 
 
सध्या जागतिक परिस्थिती पाहता नवीन रुग्णसंख्येमध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे. परंतु दैनंदिन कोविड मृत्यूसंख्येत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  कोरोनाची परिस्थिती पाहता आपल्या जिल्ह्यात आणि राज्यात आणि जगात हिच परिस्थिती आहे. यावर टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. कदम म्हणाले की, या परिस्थितीमागे काय कारण आहे हे आम्हीसुद्धी शोधतोय कारण गेले काही दिवस रुग्णसंख्येत वाढ नाही मात्र कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या जास्त आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर राज्यातही नियम शिथील करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.अजित पवार यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.