शारदा गणेशाच्या अंगावरील दागिन्यांची चोरी
पुण्यातील अखिल मंडई मंडळाच्या शारदा गणेशाच्या अंगावरील दागिन्यांची चोरी झाली. या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही चोरीची घटना कैद झाली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, अखिल मंडई मंडळाच्या प्रसिध्द शारदा गणेशाच्या अंगावरील दागिन्यांची गुरूवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरी झाली. या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजमध्ये एक व्यक्ती येउन कडी कोयंडा तोडल्याचे दिसत आहे.
गणपतीचे दोन हार, शारदेचे एक मंगळसूत्र आणि एक हार असे पंचवीस तोळ्याचे दागिने मूर्तीच्या अंगावर होते, असे मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी सांगितले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरटा कुलूप तोडून मंदिरात आला. त्याच्या तोंडाला मास्क होता. मात्र मंचावर जाताना त्याचा मास्क खाली झाला त्यामुळे त्याचा चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.