रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (15:49 IST)

Raksha Bandhan 2021 रक्षाबंधन 2021 कधी आहे, जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

या वर्षी राखीचा सण 22 ऑगस्ट, रविवारी रोजी आहे. या वर्षी पौर्णिमेची तारीख 21 ऑगस्ट संध्याकाळपासून सुरू होईल आणि 22 ऑगस्ट रोजी सूर्योदयाला पौर्णिमा असेल. तर 22 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाईल.
 
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त 
 
शुभ वेळ :- 22 ऑगस्ट, रविवार सकाळी 05:50 ते संध्याकाळी 06:03 पर्यंत
दुपारी रक्षाबंधनासाठी सर्वोत्तम वेळ:- 01:44 ते 04:23 पर्यंत
 
यावर्षी रक्षाबंधनाच्या सणावर शोभन योग बनत आहे आणि या वर्षी राखी बांधण्यासाठी 12 तासांचा मुहूर्त आहे.
 
2021 मध्ये रक्षाबंधन 22 ऑगस्ट रोजी आहे. 21 ऑगस्ट संध्याकाळपासून पौर्णिमेची तारीख सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी राखीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. 22 ऑगस्ट रविवार आहे.
 
रक्षाबंधन तिथी - 22 ऑगस्ट 2021, रविवार
पूर्णिमा तिथी प्रारंभ - 21 ऑगस्ट 2021, संध्याकाळी 03:45 मिनिट
पूर्णिमा तिथी समापन - 22 ऑगस्ट 2021, संध्याकाळी 05:58 मिनिट
शुभ मुहूर्त - सकाळी 05:50 मिनिटापासून ते संध्याकाळी 06:03 मिनिटापर्यंत
रक्षाबंधन अवधी - 12 तास 11 मिनिट
रक्षाबंधनासाठी दुपारची वेळ - 01:44 ते 04:23 मिनिटापर्यंत
अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:04 ते 12:58 मिनिटापर्यंत
अमृत काळ - सकाळी 09:34 ते 11:07 पर्यंत
ब्रह्म मुहूर्त - 04:33 ते 05:21 पर्यंत
भद्रा काळ - 23 ऑगस्ट 2021 सकाळी 05:34 ते 06:12 पर्यंत
 
भद्रा काळ आणि राहू काळ या दरम्यान राखी बांधली जात नाही कारण या काळात शुभ कार्य निषिद्ध मानले जाते. या वर्षी भद्राची सावली राखीवर नाही. भद्रा काळ 23 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 05:34 ते 06:12 पर्यंत असेल आणि 22 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस राखी बांधली जाईल.