गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By वेबदुनिया|

श्रीरामस्तुती

संसार संगे बहू शीणलो मी
कृपा करी रे रघुराज स्वामी
प्रारब्ध माझे सहसा टळेना
तुजविण रामा मज कंठवेना

मन हे विकारी स्थिरता न ये रे
त्याचेनि संगे भ्रमती भले रे
अपुर्व कार्या मन हे विटेना
तुजविण रामा मज कंठवेना

मायाप्रपंची बहु गुंतलो रे
विशाळ व्याधीमध्ये बांधलो रे
देहाभिमाने अति राहवेना
तुजविण रामा मज कंठवेना

दारिद्रदुखेः बहु कष्टलो मी
संसारमायेतचि गुंतलो मी
संचीत माझे मजला कळेना
तुजविण रामा मज कंठवेना

लक्ष्मीविलासी बहु सौख्य वाटे
श्रीराम ध्यातां मनिं कष्ट मोठे
प्रपंचवार्ता वदता विटेनां
तुजविण रामा मज कंठवेना

अहोरात्र धंदा करितां पुरेना
प्रारब्धयोगे मज राहवेना
भवदुखः माझे कधिंही टळेना
तुजविण रामा मज कंठवेना

मजला अनाथा प्रभु तूंच दाता
मी मुढ कीं जाण असेंच आता
दासा मनीं आठव वीसरेना
तुजविण रामा मज कंठवेना

श्री राम जय राम जय जय राम