शुक्रवार, 24 मार्च 2023
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Modified मंगळवार, 20 एप्रिल 2021 (18:30 IST)

Shri Ram Navami : श्रीराम नवमी पौराणिक पूजा विधी, शुभ मुहूर्त

यंदा श्रीराम नवमी 21 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. चैत्र नवरात्री नवमी रामनवमी रुपात साजरी केली जाते. श्रीरामाच्या पूजा-अर्चना साठी जाणून घ्या या दिवशी काय करावे-
 
* सर्वात आधी अंघोळ केल्यानंतर पवित्र होऊन पूजास्थळी पूजन सामुग्रीसह बसावे.
 
* पूजेत तुळशीचे पान आणि कमळाचं फुलं असावं.
 
* सर्व सामुग्रीसह श्रीराम नवमीची षोडशोपचार पूजा करावी.
 
* श्रीरामाल प्रिय खीर आणि फळं-मूळ प्रसाद म्हणून तयार ठेवावे.
 
* पूजा झाल्यावर घरातील सर्वात लहान मुलीच्या किंवा स्त्रीच्या कपाळावर तिलक करावं.
 
पूजा विधी
सकाळी लवकर उठून नित्य कर्म झाल्यावर अंघोळ करावी. स्वच्छ वस्त्र धारण करुन पूजा गृह शुद्ध करावं. सर्व सामुग्री एकत्र करुन आसानावर बसून जावं. चौरंगावर लाल कपडा घालावा. त्यावर श्रीरामची मूर्ती स्थापित करावी. सोबतच दरबार सजवावा. श्रीरामाचा पूर्ण दरबार ज्यात चारी भावंड आणि हनुमान यांचे देखील दर्शन होत असतील.
 
पवित्रीकरण:-
हातात पाणी घेऊन निम्न मंत्र जप करत पाणी स्वत:वर शिंपडावं आणि स्वत:ला पवित्र करावं.
 
ॐ पवित्रः अपवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपिवा।
यः स्मरेत्‌ पुण्डरीकाक्षं स वाह्यभ्यन्तर शुचिः॥
 
पृथ्वी पूजा:-
पृथ्वी देवीला नमस्कार करत हा मंत्र उच्चार करावा:- 
ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता।
त्वं च धारय मां देवि पवित्रं कुरु चासनम्‌॥
पृथिव्यै नमः आधारशक्तये नमः
 
आचमन :-
चमच्याने तीन वेळा पाण्याचे थेंब स्वत:वर शिंपडत मंत्र उच्चारण करावं- 
ॐ केशवाय नमः
ॐ नारायणाय नमः
ॐ वासुदेवाय नमः
 
नंतर ॐ हृषिकेशाय नमः म्हणत आपला हात उघडून अंगठ्याने ओठ पुसावे. नंतर शुद्ध पाण्याने हात धुवावे.
 
संकल्प :-
आता संकल्प करावा. संकल्प करण्यासाठी उजव्या हातात गंगाजल (गंगाजल नसल्यास शुद्ध पाण्यात तुळशीचं पान टाकावं), फुलं, अक्षता, विडा, सुपारी, शिक्के हातात घेऊन 
 
मंत्राद्वारे रामनवमी पूजेचं संकल्प करावं :-
ॐ विष्णुर्विष्णुर्विष्णुः। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्याद्य श्रीब्रह्मणो द्वितीयपरार्द्धे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरेऽष्टाविंशतितमे कलियुगे प्रथमचरणे जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे आर्यावर्तान्तर्गतब्रह्मावर्तैकदेशे पुण्यप्रदेशे बौद्धावतारे वर्तमाने यथानामसंवत्सरे अमुकामने महामांगल्यप्रदे मासानाम्‌ उत्तमे चैत्रमासे शुक्लपक्षे नवमीतिथौ अमुकवासरान्वितायाम्‌ अमुकनक्षत्रे अमुकराशिस्थिते सूर्ये अमुकामुकराशिस्थितेषु चन्द्रभौमबुधगुरुशुक्रशनिषु सत्सु शुभे योगे शुभकरणे एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभ पुण्यतिथौ सकलशास्त्र श्रुति स्मृति पुराणोक्त फलप्राप्तिकामः अमुकगोत्रोत्पन्नः अमुक नाम अहं रामनवमी पूजा करिष्ये।

या संंकल्पानंंतर पाणी जमिनीवर सोडून द्या.
 
गणपती पूजा:-
यानंतर चौरंगावर तांदळाची रास करुन त्यावर गणपतीची मूरती ठेवून (मूर्ती नसेल तर सुपारीवर मौली गुंडाळून गणेशच्या रुपात ठेवावी) स्थापित करावी. आता पंचोपचार विधीने गणपतीची पूजा करावी. धूप, दीप, अक्षत, चंदन/शेंदूर आणि नैवेद्य समर्पित करत गणपतीची पूजा करावी.
 
गुरु वंदना:-
दोन्ही हात जोडून आपल्या गुरुला नमन करावं.
 
कलश पूजन:-
मातीच्या कलशमध्ये पाणी भरुन ठेवावं. त्यात दूर्वा, शिक्के, अक्षता टाकून गंगाजल मिसळावं. आंब्याची पाने लावून त्यावर लाल कपड्यात गुंडाळलेलं नारळ ठेवावं. तांदळाने चौरंगाजवळ अष्टदल कमळ काढावे. त्यावर कलश स्थापित करावे. कलशावर कुंकाने स्वास्तिक काढावे. धूप, दीप, अक्षत, चंदन, नैवेद्य समर्पित करत कलशाची पूजा करावी. दोन्ही हात जोडून कलशाला नमस्कार करावा.
 
ध्यान:-
दोन्ही हात जोडून श्री रामचंद्राचे ध्यान करत श्रीराम श्लोक वाचावे:-
राम रामेति रमेति रमे रामे मनोरमे
सहस्त्र नाम ततुल्यं राम नामं वारानने
 
आवाहन:-
प्रभू श्रीरामचंद्राचे आवाहन करावे:-
हातात पुष्प आणि अक्षता घेऊन प्रभू रामाला आसान समर्पित करावे.
फुलाने पाणी घेऊन श्रीरामाचे पाय धुण्यासाठी पाणी अपिर्त करावे.
फुलाने पाणी घेऊन आचमनासाठी रामाला जल अपिर्त करावे.
चमच्याने दुध आणि मध श्रीरामाला अर्पित करावे.
फुलांनी स्नान हेतू श्रीरामाला जल अर्पित करावे.
 
पंचामृत स्नान:-
दुग्ध स्नान- पुष्पाने दुग्ध स्नानासाठी श्रीरामाला दुध समर्पित करावे, नंतर शुद्ध जल समर्पित करावे.
 
दधि स्नान- फुलाने दही स्नान हेतू श्रीरामाला दही समर्पित करावे नंतर शुद्ध जल समर्पित करावे.
 
घृतं स्नान- पुष्पाने घृत स्नान हेतू निम्न मंत्र उच्चारण करत श्रीरामाला तूप समर्पित करावे नंतर शुद्ध जल समर्पित करावे.
 
मधु स्नान- पुष्पाने मधु स्नान हेतू श्रीरामाला मध समर्पित करुन नंतर शुद्ध जल समर्पित करावे.
 
शर्करा स्नान- पुष्पाने शर्करा स्नान हेतू श्रीरामाला साखर ‍समर्पित करावी.
 
शुद्धोदक स्नान- पुष्पाने शुद्ध जल घेऊन शुद्धोदक स्नान हेतू श्रीरामाल जल समर्पित करावे.
 
वस्त्र:- हातात पिवळ वस्त्र घेऊन श्रीरामाला वस्त्र समर्पित करावे.
 
यज्ञोपवित:- हातात यज्ञोपवित घेऊन श्रीरामाला यज्ञोपवित समर्पित करावे.
 
गंध:- हातात अत्तर (गंध) घेऊन मंत्र उच्चारणासह श्रीरामाला गंध समर्पित करावे.
गंधं समर्पयामि
 
अक्षत:- हातात अक्षता घेऊन मंत्र उच्चारणासह श्रीरामाला अक्षता समर्पित कराव्या.
अक्षतं समर्पयामि
 
पुष्प:- हातात फुल आणि तुळस घेऊन श्रीरामला समर्पित करावं.
 
अंग पूजा:- डाव्या हातात फुल आणि अक्षता घेऊन मंत्र उच्चारणासह श्रीरामाच्या विविध अंगावर निमित्त जरा-जरा अक्षता, फुलं अर्पित करत राहा:-
 
ॐश्री रामचन्द्राय नम: ।पादौ पूजयामि॥
ॐ श्री राजीवलोचनाय नम: ।गुल्फौ पूजयामि॥
ॐ श्री रावणान्तकाय नम: ।जानुनी पूजयामि॥
ॐ श्री वाचस्पतये नम: ।ऊरु पूजयामि॥
ॐ श्री विश्वरूपाय नम: ।जंघे पूजयामि॥
ॐ श्री लक्ष्मणाग्रजाय नम: ।कटि पूजयामि॥
ॐ विश्वमूर्तये नम: ।मेढ़्र पूजयामि॥
ॐ विश्वामित्र प्रियाय नम: ।नाभिं पूजयामि॥
ॐ परमात्मने नम: ।हृदयं पूजयामि॥
ॐ श्री कण्ठाय नम: ।कंठ पूजयामि॥
ॐ सर्वास्त्रधारिणे नम: ।बाहू पूजयामि॥
ॐ रघुद्वहाय नम: ।मुखं पूजयामि॥
ॐ पद्मनाभाय नम: ।जिह्वां पूजयामि॥
ॐ दामोदराय नम: ।दन्तान् पूजयामि॥
ॐ सीतापतये नम: ।ललाटं पूजयामि॥
ॐ ज्ञानगम्याय नम: ।शिर पूजयामि॥
ॐ सर्वात्मने नम: ।सर्वांग पूजयामि॥
ॐ श्री जानकीवल्लभं। ॐ श्री रामचन्द्राय नमः । सर्वाङ्गाणि पूजयामि।।
 
श्रीरामाला धूप अर्पित करावं.
 
श्रीरामाला दीप अर्पित करावं.
 
श्रीरामाला नैवेद्य अर्पित करावं आणि नंतर आचमनासाठी जल अर्पित करावं.
 
श्रीरामाला फळं अर्पित करावे.
 
ताम्बूल:-
विड्याचं पान उलटून त्यावर लवंग, वेलची, सुपारी, काही गोड ठेवून तांबूल तयार करुन अर्पित करावं.
 
श्रीरामाल दक्षिणा अर्पित करावी.
 
आरती:- ताटात तुपाचा दिवा आणि कापुराने रामाची आरती करावी.
 
आरतीच्या पाण्याला तीनदा पवित्र करावं. नंतर देवी-देवतांना आरती द्यावी. उपस्थित जणांना आरती देऊन स्वत: घ्यावी.
 
मंत्र पुष्पांजली:- हातात फुल घेऊन उभे राहावे आणि या मंत्राने पुष्पांजली अर्पित करावी.
ॐ श्री जानकीवल्लभं। ॐ श्री रामचन्द्राय नमः । मंत्र पुष्पांजलि समर्पयामि।
 
प्रदक्षिणा:- आपल्या जागेवर डावीकडून उजवीकडे फिरत या मंत्रासह प्रदक्षिणा घालावी-
ॐ श्री जानकीवल्लभं। ॐ श्री रामचन्द्राय नमः । प्रदक्षिणां समर्पयामि।
 
क्षमा प्रार्थना:- दोन्ही हात जोडून श्रीरामाच्या पूजेत झालेल्या त्रुटीबद्दल क्षमा प्रार्थना करावी.
 
राम नवमी बुधवार, 21 एप्रिल 2021
 
राम नवमी मध्याह्न मुहूर्त: 11 वाजून 02 मिनिटापासून ते 13 वाजून 38 मिनिटापर्यंत
 
अवधी 02 तास 36 मिनिट
 
राम नवमी मध्याह्न क्षण: 12 वाजून 20 मिनिट
 
नवमी तिथी प्रारम्भ:
21 एप्रिल 2021 रोजी 00 वाजून 43 मिनिटापासून 
 
नवमी तिथी समाप्त: 22 एप्रिल 2021 रोजी 00 वाजून 35 मिनिटापर्यंत