प्रसिद्ध लेखक चंद्रकांत खोत यांचे निधन
प्रसिद्ध लेखक चंद्रकांत खोत (वय ७४) यांचे आज पहाटे निधन झाले. बोल्ड आणि बिनधास्त कांदबरी लेखक म्हणून त्यांची ख्याती होती, त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
त्यांच्या बोल्ड आणि बिनधास्त लेखनाचा खास वाचकवर्ग आहे. मध्यंतरी त्यांनी आध्यात्मिक लेखन सुरु केले. स्वामी रामकृष्ण परमहंस-शारदादेवी यांचा जीवनपट मांडणारे 'दोन डोळे शेजारी ', स्वामी विवेकानंदांवरील 'संन्याशाची सावली', साईबाबांवरील 'अनाथांचा नाथ' असे लेखन त्यांनी केले.