रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जुलै 2022 (11:53 IST)

हिंगोलीत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

suicide
हिंगोलीत कळनुरी तालुक्यातील बोधी येथे शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या वसतिगृहात दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. शिवानी सदाशिव वावधने (16 वर्ष रा. वारंगा)असे या मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
 
शिवानी गेल्या पाच वर्षांपासून या आश्रम शाळेत शिकत होती. काल संध्याकाळी वसतिगृहाच्या वार्डन सविता विणकरे या वसतिगृहाची नियमित तपासणी करताना त्यांना शिवानीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यांनी घडलेला प्रकार मुख्याध्यापकाला सांगितला. त्यानंतर सदर घटनेची आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता त्यांना शिवानीच्या डाव्या हातावर ब्लेडने कापल्याच्या खुणा आढळून आल्या.

या आश्रम शाळेची वेळ अकरा ते पाच असून शिवानी सकाळच्या सत्रात होती. दुपारी  तीन वाजेच्या सुमारास अर्धी सुटी झाल्यावर सर्व मुली हॉस्टेल मध्ये फ्रेश होण्यासाठी जातात आणि पुन्हा वर्गात येतात .सर्व मुली परत वर्गात आल्या मात्र शिवानी आली नाही. संध्याकाळी होस्टेलच्या वार्डन सविता यांना तिने गळफास लावल्याचे आढळून आले. शिवानीने गळफास घेऊन आत्महत्या केली.  मयत मुलीच्या वडिलांनी सदाशिव नागोराव वावधने यांनी आश्रमशाळेतील मुख्याध्यापक आणि होस्टेलच्या वार्डन सविता यांच्या विरोधात तक्रार केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.