1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 जुलै 2022 (09:14 IST)

पालघरातील आश्रम शाळेतील वसतिगृहात15 विद्यार्थ्यांना स्वाईनफ्लू ची लागण

पालघर जिल्ह्यातील गिरगाव आश्रम शाळेतील मुलामुलींच्या वसतिगृहातील 22 विद्यार्थ्यांची आजारी असल्याने तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 14 मुली आणि एक मुलगा अशा 15 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे तपासणीत आढळून आले. तर तीन विद्यार्थ्यांना डेंग्यू आणि उर्वरित विद्यार्थी व्हायरल इन्फेक्शने आजारी असल्याचे समोर आले होते.त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आश्रम शाळेत 228  मुलं मुली आहेत. या सर्वाना शाळेत जाण्यासाठी मनाई करण्यात आली असून लागण झालेले विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना आता उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात असून त्यांना वसतिगृहात वेगळे ठेवण्यात आले आहे. या वसतिगृहातील 228 विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे. यापूर्वी डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या तलासरी झाई येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना झिका आणि स्वाईन फ्ल्यू झाली होती.