रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 मे 2024 (22:56 IST)

बुलढाणात ट्रक आणि एसयूव्हीची धडक होऊन अपघातात 2 ठार

महाराष्ट्रातील बुलढाणा येथे सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.भरधाव वेगात असलेल्या एसयूव्हीची ट्रक ला धडक बसून एसयूव्ही नियंत्रणाबाहेर जाऊन महामार्गावरील रेलिंगला जाऊन धडकली. या अपघातात कार मध्ये बसलेले दोघे जागीच ठार झाले. 

नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्गावर एक एसयूव्ही आधी ट्रकला धडकली आणि नंतर महामार्गाच्या रेलिंगला धडकली. या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला.  अपघात सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास झाला. वेगाने धावणाऱ्या एसयूव्ही कारची धडक ट्रकला होऊन कार महामार्गावर जाऊन रेलिंगला धडकली आणि अपघात झाला. या अपघातात कार मध्ये बसलेले दोघे जागीच ठार झाले. 

अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहन तेथून हटवले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास करत आहे.  
 
Edited By- Priya Dixit