शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (22:11 IST)

अंबरनाथमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या २ दलालांना अटक,ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

arrest
बदलापूर रोड भागात काही महिलांकडून सेक्स रॅकेट चालविणाºया सोनू काझी (४०, रा. उल्हासनगर, ठाणे) याच्यासह दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. त्यांच्या तावडीतून एका पिडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. 
    
अंबरनाथमधील बदलापूर रोड भागातील रिलायन्स मार्केट परिसरात दोघे दलाल हे काही महिलांकडून शरिर विक्रयाचा व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याच आधारे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील, जमादार श्रद्धा कदम, डी. व्ही. चव्हाण, डी. के. वालगुडे, हवालदार पी. ए. दिवाळे, अंमलदार आर. व्ही. कदम, व्ही. बी. यादव  आणि के. डी. लादे आदींच्या पथकाने १० जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास अंबरनाथच्या बदलापूर रोड भागात सापळा लावला. त्यावेळी पोलिसांनी एका बनावट गिºहाईकाच्या माध्यमातून सोनू काझी या दलालाला गाठले. त्याने पाच हजारांमध्ये एका महिलेचा सौदा केला. ही २५ वर्षीय महिला तिथे आल्यानंतर तिला यातील तीन हजार रुपये देण्यात आले. तर एक हजार रुपये सोनूने स्वत:कडे ठेवून उर्वरित एक हजार रुपये गगन शर्मा या त्याच्या साथीदार रिक्षा चालकाला दिले. या बनावट गिऱ्हाईकाने इशारा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी धाड टाकून सोनू आणि गगन शर्मा या दोघांना ताब्यात घेतले. 
 
Edited by: Ratnadeep Ranshoor