केईएम रुग्णालयात २८ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या
केईएम रुग्णालयात एका डॉक्टराने आत्महत्या केली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. प्रणव जयस्वाल असं आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचं नाव आहे. विषारी इंजेक्शन घेऊन या डॉक्टरनं स्वत:ला संपवलं.
याबाबत अधिक माहिती अशी की, घटनास्थळी कुठलीही सुसाइड नोट मिळालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी आत्महत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे. प्रणव जयस्वाल केईएम रुग्णालयात रेसिडेंट मेडिकल डॉक्टर या पदावर कार्यरत होता. तो मूळचा अमरावतीचा आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.